इंडॉलॉजी कट्टा

किमया देशपांडे -

इंडॉलॉजीच्या (भारतविद्या) माध्यमातून लोकांचे प्रबोधन व मनोरंजन करणाऱ्या...

किमयाताई म्हणाल्या, ‘मी पुण्याचीच. पूर्वाश्रमीची वर्षा पिंगळे. मी एस.पी. कॉलेजमधून B.Sc. स्टॅटिस्टिक झाले. तसंच PGDCA, PQDBA, CSTE, CSPM झाले. मी टि.म.वि. मधून M.A. इंडॉलॉजी केले व पहिली आले.

आय.टी. क्षेत्रात ३२ वर्ष नोकरी केली. भारतीय ज्ञानपीठ प्रकाशित हिंदी - उर्दू - फार्शी भाषेतील श्री. मेवाराम लिखित ‘सुलतान रजिया’ ही ऐतिहासिक कादंबरी ८५० पानी आहे त्याचा मराठी भाषेत अनुवाद केला. तसंच दास्ताने - आगरा (कहाणी आग्य्राची) अनुवाद केला, हे प्रवास वर्णन आहे. जहान आरा बेगम (कहाणी मुघल शहाजादीची) सुहासिनी देशपांडे भावानुवाद केला. माझे उषा पब्लिकेशन आहे. तसंच लेखन, निवेदन, सूत्रसंचालनासाठी संहिता लेखन व त्याचे सादरीकरण मी करते. वृत्तपत्रांमधून लेखन करते. अनेक संस्था, मंडळांमधून सामाजिक कार्यात सहभाग घेते.

लॉकडाऊनच्या काळात मी काय केलं खरंतर माझं पुढचं पण पुस्तक तयार आहे. पण ते काढता आलं नाही. मग आता काय करायचं हा प्रश्न. मग या काळात मी एकेका वक्त्याला घेऊन ऑनलाईन ‘इंडॉलॉजी कट्टा’ सुरू केला. मला इतिहासाची आवड आहे. उषा पब्लिकेशनतर्फे हा व्हाट्सअप ग्रुप तयार केला. संध्याकाळच्या वेळी महिन्यातून दुसऱ्या शनिवारी इंडॉलॉजी, मायथॉलॉजी, इतिहास किंवा ऐतिहासिक संशोधन या विषयांवर. विनामूल्य व गुगलमीटच्या माध्यमातून. सुरवातीला आठवडाभर रोज घेतले. पाच दिवस ‘अल्पपरिचित शिवमूर्ती आणि पुराणकथा’ या विषयावर चैतन्य साठे यांची व्याख्यान मालिका झाली. साठे यांनीं शिवाचा परिचय, शिवाच्या अपरिचित संहारमूर्ती, अनुग्रहमूर्ती, परिवारमूर्ती आणि विशेष मूर्ती यांच्याबद्दल विस्तृत माहिती दिली. त्यामध्ये प्रत्येक मूर्तीचे वर्णन, त्या मूर्तीशी संलग्न असणारी आख्यायिका याबद्दल सांगितले.

इंडॉलॉजी व्हॉटस्अप ग्रुप केला. ११० लोकांचा ज्यांना खूप आवड आहे, पण इंडॉलॉजिस्ट नाहीत. सुरवातीला खूपच छान रिस्पॉन्स मिळाला. कारण तेव्हा काहीच चालू नव्हतं. पूर्ण बंद होतं. सगळेजण संध्याकाळी वाट बघायचे. पूर्वीच्याकाळी लोक जसे कीर्तनाला, प्रवचनाला जायचे तसं लोक ऐकत बसायचे.

त्यानंतर डॉ. राहुल देशपांडेनी ‘तुज ऐसे नाही’ या मालिकेत ‘लॅग्वेज ऑफ स्कल्पचर्स’ वेरुळ वर व्याख्यान दिले. नंतर डॉ. निलिमा थत्ते यांचं ‘भारहुतची कथन शिल्पे जातक कथा’ यावर व्याख्यान झालं. एकांचे ‘सुप्त मनाचे सामर्थ्य’ या विषयावर भाषण झाले अशी वेगवेगळ्या विषयांवर तज्ज्ञांची भाषणे झाली. तसंच दीपाली पाटवदकर यांचे ‘पाकिस्तानमधील हिंदू, जैन व बौद्ध मंदिरे’ या विषयावर झाले. अक्षरशः घरी बसून लोकांना साहित्याची भारतीय विद्येची मेजवानी होती.

कर्दळीवनावरील पुस्तकाचे लेखक पाटुकले यांनी इंडॉलॉजीचा प्रसार व्हावा म्हणून विश्वस्कूल काढले. त्या कमिटीवर राजीव मल्होत्रा, विजय भटकर, राघवेन्द्र स्वामी आहेत तिथे मी वेगवेगळी राजघराणी त्यावेळचे स्थापत्यशास्त्र, बुद्धधर्म, जैन देवळं... या विषयांवर लेक्चर्स दिली. असे मी लॉकडाऊन काळात लोकांचे मनोरंजन व प्रबोधन करण्याचा मनापासून प्रयत्न केला.

iPhone
व्याख्यान संग्रह

विषयांची यादी

जुलै २०२० ते जुलै २०२६ या कालावधीत झालेली सर्व इंडॉलॉजी कट्टा सत्रे.

68 व्याख्याने
अनु.क्र. तारीख विषय वक्ते
1 14–18 Jul 2020 (5 Days) अल्पपरिचित शिवमूर्ती आणि पुराकथा श्री. चैतन्य अरुण साठे
2 08 Aug 2020 तुज ऐसे नाही - The language of sculptures डॉ. राहुल देशपांडे
3 11 Sep 2020 भारहूतची कथनशिल्पे : जातककथा डॉ. नीलिमा थत्ते
4 10 Oct 2020 पाकिस्तानामधील हिंदू, जैन, शीख आणि बौद्ध मंदिरे सौ. दीपाली पाटवदकर
5 07 Nov 2020 सुप्त मनाचे सामर्थ्य - Power Of Our Subcouncious Mind सौ.प्राची संदीप ममदापुर
6 12 Dec 2020 महाकवी भासरचित शोकांतिका भाग 1 डॉ. सौ. मंजुषा गोखले
7 02 Jan 2020 महाकवी भासरचित शोकांतिका भाग 2 डॉ. सौ. मंजुषा गोखले
8 13 Feb 2021 प्राचीन भारतीय विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा परिचय डॉ. सौ. मुग्धा गाडगीळ
9 06 Mar 2021 शैव दर्शन आणि संप्रदाय : एक परिचय श्री. प्रणव प्रदीप गोखले
10 10 Apr 2021 सिल्क रूट - चीन, रोम आणि भारत सौ. प्रतिमा दुरूगकर
11 15 May 2021 शास्त्रामागचे विज्ञान डॉ. पं. संदीप अवचट
12 12 Jun 2021 पंढरीची वारी डॉ. सदानंद मोरे
13 10 Jul 2021 ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान डॉ. आरती अरुण दातार
14 01 Aug 2021 संत नामदेव डॉ. वनमाला पानसे
15 25 Sep 2021 ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान डॉ. आरती अरुण दातार
16 26 Sep 2021 ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान डॉ. आरती अरुण दातार
17 09 Oct 2021 श्री सरस्वत्यै नमः डॉ. भाग्यश्री पाटसकर
18 10 Dec 2021 श्रीमद्भगवद्गीतेची आजच्या जीवनातील प्रस्तुतता सौ. वैशाली गिरगावकर
19 12 Jan 2021 विवेकानंदांचा भारत प्रो.श्री.नरेंद्र नायडू
20 23 Mar 2022 एका जनार्दनी डॉ. वनमाला पानसे
21 09 Apr 2022 कोकणातील कातळशिल्पे श्री. रणजित रमेश हिर्लेकर
22 07 May 2022 नरसिंहाख्यान - अमानुष ते अतिमानुष एका अद्भुताची यात्रा श्री. प्रणव प्रदीप गोखले
23 18 Jun 2022 जीवन गुणवत्ता वाढविण्यासाठी जीवनशैली बूस्टर (Lifestyle Boosters for Enhancing Life Quality). श्री. राजीव पानसे
24 02 Oct 2022 विश्वजननी....मातृशक्ती डॉ.कल्याणी आनंद हर्डीकर
25 23 Oct 2023 दीपोत्सव २०२२- नाव नसलेले गाव डॉ.पंडित संदीप अवचट, धनश्री गणात्रा, नीलिमा हिरवे आणि किमया देशपांडे
26 28 Dec 2022 देशी व परदेशी मंदिरातील रामायणाचे चित्रण सौ दिपाली नरेंद्र पाटवादकर
27 19 Jan 2023 मोर बस्तर डॉ. नीलिमा थत्ते
28 23 Feb 2023 आमचो छत्तीसगढ डॉ. नीलिमा थत्ते
29 17 Mar 2023 प्राचीन भारतीय परिधान शैली (सिंधू संस्कृती ते गुप्त काळ) श्वेता काजळे
30 05 Apr 2023 रामायणातील स्त्री व्यक्तिमत्वे प्रा. उर्मिला अघोर
31 02 May 2023 नीलिमा प्रॉडक्शन प्रस्तुत - प्रण नीलिमा हिरवे आणि किमया देशपांडे
32 18 Jun 2023 ध्यान साधना - समाधानी आयुष्याची गुरुकिल्ली श्री. राजीव पानसे
33 24 Jul 2023 ओळख मिथक शिल्पांची श्री. आशुतोष बापट
34 24 Aug 2023 अंकशास्त्र आणि स्वभाव डॉ. सौ. शिल्पा अग्निहोत्री
35 29 Sep 2023 महायोगी श्रीअरविंद सुहासिनीताई देशपांडे
36 20 Oct 2023 महायोगी श्रीअरविंद - भाग २ सुहासिनीताई देशपांडे
37 03 Nov 2023 ऐतिहासिक घटना आणि आजची व्यवस्थापन तत्त्वे याचा आढावा डॉ. सौ. किमया किशोर देशपांडे
38 10 Dec 2023 "दाराशुकोह" अनुवादित ऐतिहासिक कादंबरी प्रकाशन समारंभ डॉ. सौ. किमया किशोर देशपांडे
39 04 Jan 2024 सरस्वती नदी - स्मृती आणि संशोधन मनीषा चितळे
40 19 Feb 2024 आर्यांचे आक्रमण श्री वासुदेव बिडवे
41 28 Mar 2024 विजयनगर शैलीचे लेपाक्षी डॉ. अस्मिता हवालदार
42 22 Apr 2024 रामायणातील अनभिज्ञ कथा: हनुमान विशेष श्री. गौरांग दमाणी
43 09 May 2024 महाभारतातील काही लक्ष्यवेधी प्राणिकथा डॉ. सौ. धनश्री शेजवलकर
44 11 Jun 2024 डाव्या उजव्याच्या पलीकडे सौ.दीपाली पाटवदकर आणि अ‍ॅड. विभावरी वासुदेव बिडवे
45 22 Jul 2024 पांडुरंगाष्टकम् मधील सौंदर्य स्थळे श्री. ओंकार रवींद्र जोशी
46 28 Aug 2024 मध्ययुगीन मराठी संत कवयित्री डॉ.वर्षा तोडमल
47 27 Sep 2024 श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र माहिती आणि महत्व ॲड.सौ.मंजिरी जोशी
48 12 Oct 2024 भारतीय नाट्यशास्त्राच्या परिचय डॉ. सौ सुनीला गोंधळेकर
49 19 Nov 2024 कोकणातील ख्रिश्चनांची लोकसंस्कृती श्री प्रणव पाटील
50 19 Dec 2024 प्राचीन भारतातील विज्ञान प्रा.डॉ.सौ.मनिषा पुराणिक
51 15 Jan 2025 बौद्ध धर्म आणि कला - उगम आणि विस्तार प्रा. डॉ. मंजिरी भालेराव
52 25 Feb 2025 छत्रपती श्रीशिवाजीमहाराजांचे व्यवस्थापन कौशल्य डॉ. अजित वामन आपटे
53 19 Mar 2025 अपरिचित कोल्हापूर श्री. इंद्रनील बंकापुरे
54 06 Apr 2025 रामायणातील अज्ञात कथा डॉ. सौ. किमया किशोर देशपांडे
55 15 May 2025 अहिल्याबाईंचा पंचमहायज्ञ सौ.दीपाली पाटवदकर
56 27 Jun 2025 पावसाळ्यातील गडदुर्ग दर्शन श्री. संदीप तापकीर
57 06 Jul 2025 विठ्ठल.in डॉ. नीलिमा देशपांडे
58 21 Aug 2025 त्रिशुंड गणपती मंदिराचे माहात्म्य श्री.अमोघ वैद्य
59 15 Sep 2025 वास्तुग्रंथांचा आढावा श्री. सौरभ मराठे
60 01 Oct 2025 गुजरात मधील सौर पंथ आणि सौर उपासना श्री.आशुतोष अभ्यंकर
61 21 Nov 2025 अंतर्मन शक्तींचा अनुभव: रेकी ऊर्जा आणि टेलिपथीचे गूढ विज्ञान सौ. प्राची संदीप ममदापुर
62 18 Dec 2025 जाँ बातीस्त तावर्निये याचे भारतातील प्रवास श्री. रोहित सहस्रबुद्धे, श्री. सत्येन वेलणकर आणि श्री. विनायक नेरलेकर
63 27 Jan 2026 मुंडासना काली: दख्खनेत आढळलेल्या अत्यन्त दुर्मिळ शाक्त-तांत्रिक मुर्तींचा शोध डॉ. श्री. चैतन्य अरुण साठे
64 16 Feb 2026 पेडगाव येथील मंदिरात असलेले खेळांचे पट सौ. श्रीया दीक्षित नाचरे
65 30 Apr 2026 पालखेडचे युद्ध श्री.शंतनू परांजपे
66 21 May 2026 प्राचीन भारतातील निर्मिती उद्योग : वैभवकाळाचा विस्मृतीत गेलेला इतिहास श्री. श्रीकृष्ण प्रभाकर वैद्य (श्याम वैद्य)
67 18 Jun 2026 “कन्दुकक्रीडामग्ना”- अर्थात चेंडू खेळणारी सुंदरी! डॉ. नीलिमा थत्ते
68 08 Jul 2026 परत वारी श्री. सुधीर सदानंद महाबळ