बंधूभगिनींनो आपणा सर्वांना मी केयूर देशपांडेचा नमस्कार !
भारतीय ज्ञानपीठाने प्रकाशित केलेली हिंदी-उर्दू-फार्शी भाषेतील श्री मेवारामसर लिखित ऐतिहासिक कादंबरी "सुल्तान रजिया" हिचा मराठी भाषेत अनुवाद माझी आई सौ किमया किशोर देशपांडे हिने केला. तो अनुवाद प्रकाशित करण्याच्या निमित्त्याने श्री मेवारामसरांच्याच सल्ल्याने व मार्गदर्शनाने उषा पब्लिकेशनची स्थापना २९ जून २०१३ रोजी झाली. गेल्या दीड वर्षात उषा पब्लिकेशनतर्फे नीलिमा नृत्यालयाच्या सहकार्याने दिवाळी पहाट, साज, नटनगरसे बात करे, दत्त जयंतीच्या निमित्याने कीर्तन असे सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
ऐतिहासिक किंवा संशोधनात्मक लिखाण उषा पब्लिकेशनतर्फे करायचे हे मनाशी पक्के ठरविले आहे. त्यानुसार श्री मेवारामसरांनी लिहिलेली "दास्ताने-आग्रा" ही किमया किशोर देशपांडे ह्यांची अनुवादित कादंबरी तर इतिहासाच्या अभ्यासक आणि जेष्ठ लेखिका सौ सुहासिनीताई देशपांडे भावानुवाद जहानआरा बेगम (कहाणी मुघल शाहजादीची) तसेच साहित्यमहोपाध्याय श्री मेवारामलिखित "गुनाहौं की देवी" ही हिंदी कादंबरी. या तिन्ही पुस्तकांचा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे. आजच्या ह्या कार्यक्रमात तीन कादंबऱ्या एकाचवेळी रसिक वाचकांसमोर ठेवताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे. आपणास त्या नक्की आवडतील अशी खात्री बाळगतो. अजून एक गोष्ट आज आपण करीत आहोत ते म्हणजे उषा पब्लिकेशन वेबसाईटचे उद्घाटन !
मी उषा पब्लिकेशनच्या पुढील वाटचालीसाठी आपणा सर्वांचे आशीर्वाद मागतो.
आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मा. आमदार प्राध्यापिका मेधाताई कुलकर्णी ह्यांना विनंती करतो कि त्यांनी कृपया वेबसाईटचे उद्घाटन करावे.
धन्यवाद !!
दाराशुकोह
मूळ ‘दाराशुकोह’ ही मेवाराम लिखित कादंबरी वाचताना मला जाणवले की, हिंदू-इस्लामिक तत्त्वज्ञान परंपरांना जोडणारा विद्वान व सूफी साधक असलेल्या शहाजहानच्या ज्येष्ठ पुत्राच्या असामान्य जीवनाबद्दल मराठी भाषिक वाचकांना फारशी माहिती नाही. मराठी आवृत्तीमुळे सिंहासनापेक्षा ज्ञान आणि अध्यात्माची निवड करणाऱ्या आणि आजही समर्पक असणाऱ्या धार्मिक सलोख्याचा दृष्टिकोन बाळगणाऱ्या या शहाजाद्याची ओळख वाचकांना होईल, असे मला वाटले.
अधिक वाचासुल्तान रजियाा
मूळ ‘सुल्तान रजियाा’ ही कादंबरी वाचताना मला जाणवले की, अतुलनीय धैर्य आणि कौशल्याने राज्य करणाऱ्या दिल्लीच्या पहिल्या महिला तुर्क शासकाच्या इतिहासाबद्दल मराठी भाषिक वाचकांना फारशी माहिती नाही. मराठी आवृत्तीमुळे इल्तुतमिश आणि त्यांची कन्या रझिया या काळातील अत्यंत कुशल शासकांची ओळख वाचकांना होईल, असे मला वाटले. दरबारी राजकारण, सत्तासंघर्ष आणि पुरुषप्रधान जगात राज्य करणाऱ्या एका स्त्रीच्या धैर्याचे प्रभावी चित्रण या कादंबरीत आढळते.
अधिक वाचादास्ताने आग्रा
मूळ ‘दास्ताने–आग्रा’ वाचताना मला जाणवले की, आग्र्याच्या वास्तूंमध्ये दडलेल्या समृद्ध इतिहासाबद्दल मराठी भाषिक वाचकांना फारशी माहिती नाही — ताजमहाल, आग्रा किल्ला आणि फतेहपूर–सीकरी येथे सांगण्यासारख्या असंख्य कथा आहेत. मराठी आवृत्तीमुळे वाचकांना या वैभवशाली इतिहासातून फिरता येईल आणि शहराला घडवणाऱ्या घटना व व्यक्तींची ओळख होईल, असे मला वाटले. इतिहास आणि प्रभावी कथनशैलीची सांगड घालत हे पुस्तक आग्र्याचा विसरलेला आवाज आणि चैतन्यमय भूतकाळ आजच्या वाचकांसमोर जिवंत करते.
अधिक वाचा