उषा पब्लिकेशनविषयी...
उषा पब्लिकेशनचा मूळ उद्देश म्हणजे मराठी भाषा, इतिहास, संस्कृती आणि साहित्य यांचा प्रचार–प्रसार करणे, तसेच संशोधनात्मक लेखन आणि हिंदी, उर्दू, फारसी व इंग्रजीतील दर्जेदार साहित्याचे मराठीत रूपांतर करून वाचकांसाठी समृद्ध आणि विविधांगी साहित्यसंपदा उपलब्ध करून देणे. ऐतिहासिक आणि सांस्कृतिक विषयांवरील अभ्यासवृद्धी, सर्जनशील लेखन आणि ज्ञानविस्तार हेही संस्थेचे महत्त्वाचे ध्येय आहे.
२०१३ साली भारतीय ज्ञानपीठ, नवी दिल्ली यांनी प्रकाशित केलेल्या श्री. मेवाराम लिखित सुल्तान रझिया या ऐतिहासिक कादंबरीच्या मराठी अनुवादाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने सौ. किमया किशोर देशपांडे यांनी उषा पब्लिकेशनची स्थापना केली. त्यानंतर विविध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि अभिरुचिपूर्ण ग्रंथांच्या प्रकाशनातून संस्थेची साहित्यसेवा सातत्याने विस्तारित होत आहे.
प्रत्येक प्रकाशन समारंभात साहित्यसेवकांचा गौरव करण्यासाठी उषा पब्लिकेशनतर्फे “साहित्यउषा” पुरस्कार प्रदान करण्याची परंपरा जपली जाते. स्वर्गीय सुलभा व दिगंबर भिकाजी देशपांडे यांच्या स्मरणार्थ हिंदी साहित्यनिर्मितीसाठी आणि स्वर्गीय उषा व अॅड. वसंत पिंगळे यांच्या स्मरणार्थ मराठी साहित्यनिर्मितीसाठी.
जुलै २०२० पासून उषा पब्लिकेशनने इंडॉलॉजी कट्टा ही मासिक ऑनलाइन व्याख्यानमाला सुरू केली असून, भारतीय इतिहास, संस्कृती, तत्त्वज्ञान, पुरातत्त्व, साहित्य आणि समाजविचार यांवरील तज्ज्ञ व्याख्यानांच्या माध्यमातून अभ्यासक, विद्यार्थी आणि रसिकांसाठी एक समृद्ध, संशोधनपर व्यासपीठ निर्माण झाले आहे.
गुणवत्ता, प्रामाणिकता, संशोधनाची निष्ठा आणि साहित्यसेवेची सातत्यपूर्ण भावना यांना केंद्रस्थानी ठेवून उषा पब्लिकेशन पुढील वाटचाल करत आहे आणि वाचनसंस्कृती दृढ करण्यासह भारतीय ज्ञानपरंपरेचा प्रकाश अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प जपत आहे.
धन्यवाद !
उषा पब्लिकेशन